

Chakur robbery solved; two arrested, gold and weapon seized.
Sakal
चाकूर : महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने लुटल्याच्या घटनेचा गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणात सराईत आंतरराज्यीय गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २७ ग्रॅम सोन्याचे दागिने, धारदार चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.