औरंगाबादकरांनो, गणेश विसर्जनाच्या दिवशी या मार्गात बदल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक मार्गातही बदल केले असून, काही मार्ग बंद राहणार आहेत.

औरंगाबाद - लाडक्‍या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस दल सज्ज असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. ड्रोनचीही गस्त राहणार असून, अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक मार्गातही बदल केले असून, काही मार्ग बंद राहणार आहेत.
 

या मार्गावर केले बदल

 • संस्थान गणपती ते गांधी पुतळा, सिटी चौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, एसबी कॉलेजमार्गे जिल्हा परिषद मैदान हा मुख्य मिरवणुकीचा मार्ग आहे. तो रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद राहील. 
 • संस्थान गणपती ते शहागंज, चमन, गांधी पुतळा, सिटी चौक, जुना बाजारमार्गे भडकलगेट. 
 • जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट-मोंढा ते राजाबाजार. 
 • निजामोद्दीन दर्गाह रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज, चमन. 
 • भुरे पहिलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन. 
 • चेलिपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजूरपुरा चौक ते गांधी पुतळा. 
 • लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड. 
 • कामाक्षी लॉज ते सिटी चौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केटमार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व पूर्व-पश्‍चिम गल्ल्या बंद राहतील. 
 • सिटी चौक पोलिस ठाणे पश्‍चिमेकडील बुऱ्हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली. 
 • बुढीलाइन जुने तहसील कार्यालय. जुना बाजार, बारुदगरनाला. 
 • सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटी चौक. 
 • सावरकर चौक, एमपी लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा/बळवंत वाचनालय चौक. 
 • अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक, बाबूराव काळे चौक. 

 
ही वाहने अपवाद 
वाहतूक बंद केलेल्या मार्गावर गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर मिरवणुकीत सामील होणाऱ्या देखाव्यांची व तत्सम अन्य वाहने सुरवातीला मिरवणुकीच्या रांगेत लावण्यासाठी व नंतर प्रात्यक्षिक मिरवणुकीत असताना अपवाद राहतील. 
  
या मार्गांचा करा वापर 

 • रोशनगेटकडून शहागंजकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी चेलिपुरा चौक, लोटाकारंजा, सिटी चौकमागील रोडने वाहतूक सुरू राहील. 
 • शहागंजकडे येणाऱ्या सिटी बस या अण्णा भाऊ साठे चौकापर्यंत येऊन तेथून परत टाऊन हॉल उड्डाणपूल, भडकलगेटमार्गे जातील. 
 • मिलकॉर्नरकडून औरंगपुराकडे येणारी सर्व वाहने अंजली टॉकीजजवळून उजवीकडे नागेश्‍वरवाडी डॉ. खनाळे हॉस्पिटल, निराला बाजार, समर्थनगरमार्गे तसेच अंजली टॉकीजमार्गेपासून डावीकडे खडकेश्‍वर महापालिकामार्गे जातील. 
 • क्रांती चौकाकडून येणारी सर्व वाहने सिल्लेखाना चौक, समर्थनगर चौक मार्गे बसस्थानकाकडे जातील. 

 

सिडको-हडको 

 • चिश्‍तिया कॉलनी चौक, बजरंग चौक, ओंकार चौक, सिडको पोलिस स्टेशन समोरून, एन- 7, स्टॉप, जळगाव रोडने आंबेडकर चौक, एन- 9, एम- 2, एन- 11, टी.व्ही. सेंटर चौक, एन- 12 स्वर्ग हॉटेलजवळील विहीर असा असून हा मार्ग मिरवणुकीदरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. 
 • चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टी.व्ही. सेंटरकडे जाणारा रस्ता. 
 • एन- 1 चौक ते चिश्‍तिया चौक, आविष्कार चौक, सेंट्रल जकात नाका ते चिश्‍तिया चौक, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्यालय/द्वारकादास साडी सेंटर ते चिश्‍तिया चौक. 
 • आझाद चौक ते बजरंग चौक, देवगिरी नागरी सहकारी बॅंक ते बजरंग चौक, बळीराम पाटील हायस्कूल ते ओंकार चौक-वेणूताई चव्हाण हायस्कूल, एन- 7, पोलिस स्टेशन सिडको ते ओंकार चौक, आंबेडकर चौक ते बळीराम पाटील चौक, पार्श्‍वनाथ चौक ते जिजाऊ चौक, शरद टी ते टी.व्ही. सेंटर चौक. 
 • गजानन महाराज मंदिर परिसरातून निघणाऱ्या व शिवाजीनगर विसर्जन पॉइंटकडे जाणाऱ्या मिरवणुकीदरम्यान गजानन मंदिर, जवाहरनगर पोलिस स्टेशनसमोरील चौक, गारखेडा, सूतगिरणी, शिवाजीनगर विसर्जन पॉइंट तसेच सेव्हनहिल ते गजानन मंदिर, त्रिमूर्ती चौक ते गजानन मंदिर, पतियाळा बॅंक ते गजानन मंदिर, सूतगिरणी रस्ते व गल्ल्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. 

 
नवीन औरंगाबाद, सिडको, हडको, गारखेडा

 • गजानन महाराज मंदिर विसर्जन मिरवणुकीला पर्यायी मार्ग 
 • जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गणेश कॉलनीमार्गे टी.व्ही. सेंटरकडे जाणारी वाहतूक हडको कॉर्नर मार्गे जाईल. 
 • पतियाळा बॅंकेकडून गजानन महाराज मंदिर चौकाकडे येणारी वाहने हिंदुराष्ट्र चौक, विजयनगर, गजानन कॉलनी, रिलायन्स मॉलमार्गे जातील. 
 • जवाहरनगर पोलिस स्टेशनकडून गजानन महाराज मंदिरकडे येणारी वाहने माणिक हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या पाठीमागील रोडने त्रिमूर्ती चौकाकडे जातील. 
 • त्रिमूर्ती चौकाकडून गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने डॉ. हेडगेवार रुग्णालयाचिा पाठीमागील रोड, माणिक हॉस्पिटल, जवाहरनगर पोलिस स्टेशनमार्गे जातील. 
 • सेव्हनहिल उड्डाणपूल गजानन महाराज मंदिरकडे येणारी वाहने जालना रोडमार्गे आकाशवाणीकडे जातील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in transport routes at Aurangabad