esakal | राजकीय सूडबुद्धीने पंकजा मुंडेंवर गुन्हा, भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja_Munde

यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेऊन ऑनलाइन दसरा मेळावा घेणार असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर केले.

राजकीय सूडबुद्धीने पंकजा मुंडेंवर गुन्हा, भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेऊन ऑनलाइन दसरा मेळावा घेणार असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. गडावर कोणीही येऊ नये असे असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, भगवान बाबांवरील भक्तीने प्रेरित होऊन उत्स्फूर्तपणे भक्तगण त्या ठिकाणी जमा झाले. स्वतः पंकजा मुंडे यांनी परवानगी घेऊन दर्शनाला गेल्या व ऑनलाइन मेळाव्याला मार्गदर्शन केले. परंतु, राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.

कार्यकर्त्यांच्या नंतर गुन्हा दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत, ट्विट करुन पंकजा मुंडे यांचा संताप 


त्यांनी पत्रकात म्हटले की, आज जिल्ह्यासह अनेक ठिकाणी १४४ कलम व इतर नियमांचा भंग बिनधास्तपणे होत आहे. असे असताना केवळ लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा नोंद करून जाणीवपूर्वक त्यांना अडचणीत आणण्याचा खटाटोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. अतिवृष्टीनंतर सर्वत्र सत्ताधारी नेते पाहणीसाठी फिरले. त्यांच्या मागेपुढे शेकडो कार्यकर्ते फिरत होते. त्यावेळी मात्र अशा सत्ताधारी नेत्यांवर कोणताही गुन्हा नोंद करण्याचे धाडस का झालेले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


संपादन - गणेश पिटेकर