Latur | निलंग्यात मिरवणूक काढल्याने दिग्गजांवर गुन्हे दाखल, २० जणांवर कारवाई

निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News
Crime Newsesakal

निलंगा (जि.लातूर) : मिरवणूक काढण्यासाठी बंदी असतानाही निलंग्यात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूक प्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची माहीती अशी की, महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) यंदा सर्वधर्मीय शिवजयंती (Shiv Jayant) साजरी करण्यात आली. शनिवारी (ता.१९) हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत राज्य शासनाचे मिरवणूक बंदी असताना दोनशे ते अडीचशे लोकांना सोबत घेऊन पायी मिरवणूक काढून आदेशाचे उल्लंघन केले. (Charges File Against 20 People For Public Rally In Nilanga In Latur)

Crime News
हृदयविकाराचा झटका काल आला, आज चक्क मतदार रुग्णवाहिकेतून पोचला मतदानासाठी

या प्रकरणी पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय सोळूंके, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजित माने, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश रेशमे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य, दयानंद चोपणे, ईश्वर पाटील, सुधाकर पाटील, पंचायत समिती सदस्य महेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ईस्माइल लदाफ, युवा शहराध्यक्ष धम्मानंद काळे, रामलिंग पटसाळगे, देवदत्त सूर्यवंशी, तुराब बागवान, अजय ढवळे, मुजीब सौदागर, प्रशांत वांजरवाडे आदींवर निलंगा (Nilanga) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com