स्किमचे आमिष दाखवून महिलांना फसवले, जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur crime case

साबण तयार करणाऱ्या कंपनीच्या स्किमचे आमिष दाखवून जिंतूर शहरासह तालुक्यातील अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्या विरोधात पोलीस ठाण्यात ता. २७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्किमचे आमिष दाखवून महिलांना फसवले, जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

- विनोद पाचपिले

जिंतूर (जि. परभणी) - साबण तयार करणाऱ्या कंपनीच्या स्किमचे (Scheme) आमिष दाखवून जिंतूर शहरासह तालुक्यातील अनेक महिलांची (Women) फसवणूक (Cheating) करणाऱ्या भामट्या विरोधात पोलीस ठाण्यात ता. २७ रोजी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील पांढरकवडा येथील कविता संजय सूर्यवंशी ह्या अंगणवाडी सेविका आहेत.त्यांना सप्टेंबर २०२१ रोजी एका मैत्रिणीने फोन केला. मुंबई येथे साबुन बनवणाऱ्या कंपनी बद्दल सूर्यवंशी यांना मैत्रिणी माहिती दिली. घरबसल्या सदर कंपनीकडून साबण तयार करण्यासाठी साहित्य मिळणार असून गृहउद्योग म्हणून साबण तयार करून दिल्यास त्याचा मोठ्याप्रमाणावर मोबदला मिळणार असल्याचे सांगितले. याविषयी अधिक माहिती शंकर कारभारी जाधव (रा. ठाणे) यांची मैत्रिणीने ओळख करून दिली.

ठाणे येथील इसमाने सूर्यवंशी यांना कंपनी बद्दल सविस्तर माहिती देऊन साबण तयार करून दिल्यास मोठ्याप्रमाणावर मोबदला मिळण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ठराविक रक्कम भरून महिलेने साबण साहित्य खरेदी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. व त्यांना स्वतः चा आयडी बनविण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने स्वतःचा आयडी बनवला. कंपनी साठी इतर महिलाही या स्कीम मध्ये सूर्यवंशी यांनी जोडल्या.शंकर जाधव यांनी काही महिलांकडून ५६ हजार जमा केले परंतु कोणत्याही महिलांना काम मिळाले नाही. कंपनीकडे भरलेले पैसेही परत मागितल्याने शंकर जाधव यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शंकर कारभारी जाधव (ठाणे) यांच्या विरोधात कविता सूर्यवंशी यांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने जिंतूर आणि परिसरातील महिलांची ५६ हजार रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Cheating On Women Showing Lure Scheme Case Has Been Registered In Jintur Police Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top