

Nationwide Chemist Strike: Medical Stores Shut Across Aḍūḷ and Surrounding Villages
Sakal
आडूळ : ऑल इंडिया केमिस्ट्स असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला पैठण तालुक्यातील आडूळ सह परिसरातील मेडिकल चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बुधवारी (ता. २०) मेडिकल दुकाने बंद ठेवली. विविध प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या बंदमुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले असून, आरोग्य विभागाकडून पर्यायी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.