
छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहातून पळून गेलेल्या नऊ मुलींच्या प्रकरणी, बालकल्याण समिती मंगळवारी बालगृहात गेली होती. समितीच्या अन्य आवश्यक प्रकरणांवर आदेश देण्यासाठी समितीने पालक, मुलांना विद्यादीप बालगृहात बोलावून घेतले. यावेळी ग्रामीण भागातील अवघ्या १२ वर्षांच्या पोक्सो पीडितेला विद्यादीपने बाहेरच बसवून ठेवले.