CCTV in Orphanage Common Bedroom : सुरक्षेच्या नावाखाली कॉमन बेडरूममध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यातून निर्माण झालेल्या घुसमटीमुळे छावणीतील विद्यादीप बालगृहातील ९ मुलींनी गच्चीवरून उड्या मारून पलायन केलं.
छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहातून ९ मुली पळून गेल्या. पण त्यात आमचा दोष काय असे म्हणणारे विद्यादिप बालगृह पुन्हा तोंडघशी पडले. मुलींच्या कॉमन बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आदेश खुद्द या बालगृहाच्या अंतर्गत समितीनेच दिले होते.