
OBC Melava Beed: राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी राज्य सरकारनेच काढलेल्या शासन निर्णयाला विरोध करण्यसाठी बीडमध्ये ओबीसी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी सरकारला जाब विचारला. पण ओबीसी नेते असलेले विजय वडेट्टीवार यांचा एक जुना व्हिडीओ त्यांनी स्क्रीनवर दाखवला.
त्या व्हिडीओमध्ये वडेट्टीवारांनी मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं दिसून येतंय. बाजूला मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत.