High Court Security Breach : तोंडाला रुमाल बांधून हायकोर्टात घुसल्या दोन महिला; प्रतिबंधित क्षेत्रात धुडगूस घालत सीसीटीव्ही फोडले!

अतिसंवेदनशील परिसरात सुरक्षा भेदल्याने खळबळ; पुंडलिकनगर पोलिसांत गुन्हा दाखल, चोरीचा प्रयत्न की घातपाताचा कट?
"Security breach in High Court! Women entered with faces covered smash CCTV cameras."

"Security breach in High Court! Women entered with faces covered smash CCTV cameras."

Sakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या अत्यंत सुरक्षित आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या परिसराची सुरक्षा भेदल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अनोळखी महिलांनी न्यायालयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जाणीवपूर्वक तोडफोड केली. कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही या महिला थेट अतिसंवेदनशील भागात पोहोचल्याने उच्च न्यायालयाच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com