

कुंभार पिंपळगाव : जि.जालना भारताबाहेर ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीचा उत्साह पाहिला मिळाला. लंडन मधे धिरजसिंह तौर यांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशने तिसऱ्या वर्षात पदार्पण करुन तिसऱ्यांदा मोठ्या उत्साहात बुधवारी (ता.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.