

Strategic Interception: Seizure of Banned Tobacco Products
Sakal
चित्तेपिपंळगाव : चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाणे आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) संयुक्त पथकाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १२ लाख २७ हजार ९६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.