
फुलंब्री - छत्रपती संभाजीनगर येथून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या चैतन्य सुनील तुपे या मुलावर बुधवारी (ता. पाच) फुलंब्री शहरातील खुलताबाद रस्त्यावर असणाऱ्या श्री चैतन्य बाल रुग्णालयात सायंकाळी पाच वाजता प्राथमिक उपचार करण्यात आले. या उपचारादरम्यान सदरील तरुणाच्या गळ्याला दोरीचे निशाण आढळून आले. त्याचबरोबर डोके, खांदा आणि गळ्याला मोठ्या जखमा असल्याचे बालरोगतज्ञ डॉ. योगेश गोरे यांनी सांगितले.