Childrens Day Special : लोह्यातील नाथबाबा भटक्यांची कैफियत

'बालपण कोळपून जाणं म्हणतात' त्याचा प्रत्यय आज (बालदिन) आला. 'खाणारी त्वांडं ज्यास्ती, नाथबाबा तर तयार करावाच लागणार! 'भीक्षेसाठीची भगवी वस्त्रं भल्या पहाटेच नेसवलेला सखाराम शिंदे नम्रपणाने सांगत होता.
Nathbaba
NathbabaSakal

लोहा - 'डोका टेकवाय्ला खुठं गावात टीचभर जागा नाय. कोरोनाच्या बीमारीनंतर गावागावात फुढं केलेल्या हातावर कुणी पैसं नायं टाकंत. डाळ-दाण्याची भीक घालत्येत; पण एकटा खुठवर मरमर करणार? बायको घरीच असते... ती सतत आजारी असते. नवी पिढी कशी शिकवायची... आज इथं तर उद्या तिथं... ह्यो रिकाम्या झोळीला कोण्ही वाली पायजेल नं काका.' पालातील सखाराम शिंदे उर्फ 'मोदी सरकार' विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होता.

'बालपण कोळपून जाणं म्हणतात' त्याचा प्रत्यय आज (बालदिन) आला. 'खाणारी त्वांडं ज्यास्ती, नाथबाबा तर तयार करावाच लागणार! 'भीक्षेसाठीची भगवी वस्त्रं भल्या पहाटेच नेसवलेला सखाराम शिंदे नम्रपणाने सांगत होता. सखारामला पालावरची सगळी मंडळी 'मोदीसरकार' म्हणतात.

शहरवजा तालुक्याच्या ठिकाणी आपलं ठाणं ( पालं) मांडली की दोनऐक डझन गाव- वस्तीला जाऊन भीक्षा मागता येते, असा त्याचा अंदाज काही खोटा नव्हता. महा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात च्या बालाजी मंदिराच्या पाटील मागील भागात भटक्यांची वस्ती आहे. सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी गायकर यांनी घराशेजारी भटक्यांना तात्पुरती वस्ती करून दिली.

आजही प्रत्येकाला घर नाही स्वतःचा मसन वाटा नाही मूलभूत हक्कापासून वंचित राहावं लागतं. मध्यंतरीच्या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी भटक्यांच्या वस्तीवर येऊन दिवाळी पहाट साजरी केली प्रत्येकाला गोडधोड देऊन घरकुल गायरान जमिनीवर घरकुल बांधून देण्याची आश्वासन दिले ते आश्वासन अजूनही हवेतच आहे शहराच्या दक्षिण भागाला मोठे गायरान आहे.

शासनाने यातील काही भाग भूखंड भटक्यांसाठी आरक्षित करावा अशी मागणी प्रलंबित आहे. आपल्या हक्कासाठी सरकारशी भांडतात. इतकं सहजासहजी मनासारखं होणारं नसले तरी त्यांची जीद्द मोठी आहे.

पालांमधल्या लेकरांना शाळेतल्या पुस्तकाची भूक लागते आहे ;पण टिचभर खळगीच्या भूकेचा प्रश्न आजही तितक्याच त्वेषात उसासे टाकतो आहे. या पालांतील पोरांचा रंगवलेला चेहरा, पायातील खडावा, भगवी कफणी नि हातातली काठी फेकून शाळंची वाट धरली तरच ते 'माणुस' म्हणून समोर येतील. पालातील भटक्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणे गरजेचे आहे.

त्यांच्या निवासाची व्यवस्था करावी लागेल. हाताला काम धंदा द्यावा लागेल. तरच पुढची पिढी शिकून मोठी होतील. दिवाळीचा फराळ कपडे नसते ही वरवरची मलमपट्टी असते. त्यामुळे आमचे जीवनमान उंचावणार नाही. अशी कैफियत दादाराव गिरी यांनी मांडली. बाई बुगडी विकणे मधु गोळा करणे असे छोटे मोठे उद्योग करत आहेत. त्यांच्या बाया माणसांना गावात सहजासहजी कोणी फिरू देत नाही.

'लोहा शहरात गत पंधरा वर्षापासून भटक्यांच्या विविध जमाती पाल मांडून आहेत. मूलभूत हक्कातील स्वतःचे घर असावे, अशी इच्छा प्रत्येकाची असते. त्यासाठी मात्र झगडावे लागते. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे गायरान पट्ट्यातील भूखंड देऊन वसाहत तयार करावी.'

- प्रा. संजय बालाघाटे, संस्थापक अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य भटके - विमुक्त संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com