
परभणी : परभणीच्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या मिरची, टोमॅटो व चिंच या वाणांना केंद्रीय उपसमितीने मान्यता दिली आहे. मिरचीचे पीबीएनसी १७, टोमॅटोचे पीबीएनटी २० आणि शिवाई नावाच्या चिंच वाणास राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.