
फुलंब्री : पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये महिला गटातून चिंचोली येथील अन्नदाता शेतकरी महिला गटाने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर महालकिनोळा येथील जय मल्हार महिला शेतकरी गटानेही राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावून वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे चिंचोलीच्या महिला शेतकरी गटाला पाच लाख रुपये तर महाल किनोळा महिला शेतकरी गटाला तीन लाख रुपयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमिर खान, पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, डॉ.अविनाश पोळ यांच्या हस्ते देण्यात आला आहे.