
बीड - अनेक गुन्हे असूनही सत्तेच्या जोरावर यंत्रणेला हाताशी धरत अगदी दोन पोलिस अंगरक्षकांसोबत वावरणाऱ्या वाल्मिक कराड याची सगळीच कुंडलीच बाहेर निघणार आहे. खंडणीतील गुन्ह्यात पोलिस कोठडी मागताना तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयासमोर विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करावयाची असल्याचे नमूद केले आहे.