- धनंजय शेटे
भूम - अमृत २.० योजनेसाठी भूम शहरातील नागरिकांनी एकत्र येत जोरदार एल्गार केला. पाण्याच्या शाश्वत आणि शुद्ध पुरवठ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी नागरिकांनी रॅलीच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेतला.
शहरातील शेकडो तरुण कार्यकर्ते, महिला मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांनी अमृत २.० च्या समर्थनाथ सहभाग नोंदवत ही योजना जनतेसाठी किती गरजेची आहे, हे अधोरेखित केले. 'आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, अमृत २.० ला साथ द्या' अशा घोषणा देत शहर दणाणून नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.