गावागावांत निर्जंतुकीकरणासाठी नगराध्यक्षांचा पुढाकार

deglur favarni 2.jpg
deglur favarni 2.jpg


देगलूर, (जि.नांदेड) ः देगलूर शहरासह गावागावांत काेराेणाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी औषधींची फवारणी केली जात आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरील सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. देगलूर शहरात नगरपालिका प्रशासनाकडून प्रत्येक वार्डात औषधांची फवारणी गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेली आहे. नगराध्यक्ष मोगलाजी शीरसेटवार व त्यांच्या सर्व टीमने यासाठी पुढाकार घेतला आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून आल्याने पालिका प्रशासनाने आता शहरातल्या विविध भागात भाजीपाला विक्री-खरेदीसाठी केंद्र सुरू केल्याने ही गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांनीही त्यासाठी जबाबदारीने वागायला हवे. शहरातील अबालवृद्धांना व गरजूंना काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मोफत मास्कचे वाटप करण्यात आले आहे. हे मास्क शहरातील माता भगिनींनी बनविलेले होते. या कामात दिगंबर कौरवार, रुपेश काशेटवार, अनुप कोडगिरे, कैलास पोलावर, राहुल पेंडकर, स्वाती दीक्षित, संतोष पाटील गोजेगावकर, तुकाराम यान्नावार, कृष्णा जोशी, सूर्यकांत पांचाळ, संगम बोधने, सूरज माने यासह अनेक युवक पुढाकार घेत आहेत.


सार्वजनिक ठिकाणीच फवारणी 
शहरातल्या बहुतांशी भागात निरजंतुकीकरणासाठी औषधींची फवारणी करण्यात आली असून (ता. तीन) पासून प्रत्येक वार्डात फवारणी बंद करून फक्त सार्वजनिक ठिकाणीच फवारणी सुरू ठेवण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला दिल्याचे मुख्याधिकारी गंगाधर ईरलाेड यांनी सांगितले.


ग्रामीण भागातही फवारणी 
कोरोना व इतर साथीचे आजार गावातील नागरिकांना होऊ नये यासाठी तालुक्यातील शिवणी, हाळी, वन्नाळी, खुतमापूर, लोणी आदी गावांसह इतर ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन फवारणी केली आहे. इतर ग्रामपंचायतींनी याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे.


अन्नधान्यासाठी सरसावले हात 
शहरातील निराश्रित गरजू नागरिकांना अन्नधान्याची मदत करण्यासाठी अनेक दानशूर पुढे येत आहेत. गौतमनगर, सिद्धार्थनगर, जुना पेट्रोलपंप परिसर, कलामंदिर, वडार समाज ऊसतोडणी कामगार अशा जवळपास २५० महिलांना तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात आले. या कामासाठी सुभाष सावकार प्रतापवार, प्रवीण शेठ अचिंतलवार, महाराष्ट्र बँकेचे निवृत्त अधिकारी गंगाधरराव भांगे, देगलूरकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कुलकर्णी, मारुती चव्हाण, माजी नगरसेवक सूर्यकांत सोनकांबळे पवार, श्रीमती चव्हाण, कीर्ती सोनकांबळे, मधुर भांगे, राहुल सोनकांबळे, बालाजी पारसेवार, व्यंकटपुरमवार, मनोज बकरे, रवी शंकरपाळे, संतोष कांबळे, छोटू तोटरे, सुनील देशपांडे यांच्यासह इतर युवक पुढाकार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com