देगलूर - तेलंगणातील निजामसागर धरणातून बुधवारी ता. २७ रोजी सकाळी ९ वा. १५ गेट उघडण्यात आल्याने सायंकाळी देगलूर येथील लेंडी व मांजरा नदीकाठच्या सांगवीउमर, शेळगाव, शेवाळा, शेखापूर, तमलुर, मेदनकलुर, या गावांना पाण्याचा मोठा फटका बसला व पूरपरिस्थिती निर्माण झाली.