देगलूर - शहरासह तालुक्यात शनिवार ता. १६ व रविवार ता. १७ च्या रात्री पडलेल्या पावसाने तसेच उदगीर व लेंडी धरणाच्या भागात पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने देगलूर तालुक्यात हाहाकार माजला. संपूर्ण रस्ते जलमय झाले. अनेक गावात पाणी शिरले आहे.
तालुक्यातील नदीकाठच्या गावातील बहुतांशी शेती पाण्याखाली गेली आहे. तर जवळपास २५ गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. देगाव बु, भोकरसखेडा, कावळगडा, कावळगाव, वळग, करडखेड, मरखेल, ढोसणी, बळेगाव, आचेगाव, लिंबा, लखा, रामपूर या गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे.