vasmat tehsil heavy rain
sakal
हिंगोली - वसमत तालुक्यात शुक्रवारी ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार उडाला. ३ तासातच झालेल्या पावसाने नदी नाले भरून वाहू लागले. शेत शिवाराना देखील नद्यांचे स्वरूप आले आहे. यामुळे सोयाबीन कापूस ही पिके पूर्णतः वाहून गेली. वसमत तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सलग दोन वेळा अतिवृष्टी झाली त्यानंतर सातत्याने अधून मधून पाऊस हजेरी लावत आहे.