cm devendra fadnavis
sakal
औसा - संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला हे पाणी शेतात घुसून पिके, जनावरे वाहून गेली, जमीन खरवडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी दुकानात घुसून व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. घरानाही या पाण्यामुळे मोठी हानी झाली आहे.