
परभणी : बदलत्या हवामानाचा सामना करताना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे. त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांनी प्रमुख पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) प्रभावी वापराचे मॉडेल विकसित करावे. ‘एआय’च्या वापराने शेतीत क्रांती घडवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कृषी विद्यापीठांना केले.