मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस, विरोधकांना काढले चिमटे

cm uddhav thackeray
cm uddhav thackeraygoogle

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या (marathwada muktisangram) निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) हे औरंगाबाद दौऱ्यावर आहे. याठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मांना अभिवादन केले. त्यानंतर मराठवाड्यासाठी एकापाठोपाठ एक घोषणा केल्या. यावेळी त्यांनी विरोधकांना चिमटे काढले. तसेच उपरोधिक आंदोलनावरून एमआयएमला टोला लगावला.

cm uddhav thackeray
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : काय आहे या दिवसाचा इतिहास? वाचा

मराठवाडा ही संतांची भूमिका आहे. संतपीठाचा इथं विषय चालू होता. संतपीठ हे संतपीठ न राहता विद्यापीठ होणं गरजेचं आहे. जगात कुठेही नसलेलं संतपीठ आपण औरंगाबाद येथे करणार आहोत. ते फक्त प्रेक्षणीय स्थळ राहता कामा नये. तसेच निजामकालीन हे वैभव परंपरा होऊच शकत नाही. आम्हाला त्यांच्या शाळा नकोत. निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करतोय. येथील हिंदूस्थानच्या शाळेत जातो हे अभिमानाने सांगता आले पाहिजे. मुख्यमंत्री आले, कामे जाहीर केले, पुढे काय होणार? असे काही लोक म्हणतील. पण, त्याचा शुभारंभ होऊन लोकार्पण करणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एमआयएमला टोला -

आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त एमआयएमने उपरोधिक आंदोलन केले. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला टोला लगावला. कामे चांगले झाल्यामुळे अनेकांनी आज मला बोर्ड दाखविले. याला विकास नाही म्हणत. हा तुमच्यासाठी विकास असेल आमच्यासाठी नाही. खरा विकास तुम्ही अजून पाहिलाच नाही. आता कुठे आम्ही विकास कऱणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठवाड्यासाठी घोषणांचा पाऊस -

  • परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा.

  • शिवसेना आणि संभाजीनगरचं (औरंगाबाद) एक वेगळं नातं आहे. संभाजीनगर-जालना मार्ग जोडून तो मार्ग हैदराबाद येथे नेण्यात येईल.

  • मराठवाड्याला समुद्र नाहीत. पण, लेणी, गडकिल्ले आहेत. मंदीरं आहेत. त्यामुळे शिर्डी आणि संभाजीनगर हवाई वाहतूक सुरू करणार.

  • संभाजीनगर येथे सिंथेटीक ट्रॅक तयार करणार आहोत. सातारा देवळाई भूमिगत मलःनिस्सरण करणार.

  • रस्त्याचं डांबरीकरण, परभणीसाठी भुयारी गटारी योजना आणि पाणीपुरवठा योजना तयार करणार. तसेच धाराशिवसाठी भूमिगत गटार योजना तयार केली जाणार.

  • हिंगोली येथे हळद प्रक्रिया प्रकल्प तयार केला जाणार आहे.

  • हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्मारक उभारणार आहोत. शिवसेनाप्रमुखांनी जे काम केलं, स्फूर्ती दिली, तेच स्फूर्ती देण्याचं काम आपण या स्मारकाच्या माध्यमातून करणार आहोत.

  • सफारी पार्कसह मराठवाड्यात २०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प तयार करणार.

  • घृणेश्वर मंदिराचा सभामंडप तयार करणार आहोत. औंढा नागनाथ हा परिसर विस्तारण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com