वाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष

Gym
Gym

औरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही संख्या मोठी असते. आता दिवाळीनंतर नुकतीच गुलाबी थंडी सुरू झाल्याने शहरात जागोजाग असलेल्या जीममध्ये झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. क्रॉसफिट, योगासने, झुंबा, किक बॉक्‍सिंग, स्पिनिंग, एरोबिक्‍स अशा वेगवेगळ्या व्यायामप्रकारांकडे तरुण आकर्षित होत आहेत.

फिटनेस ॲप्सवर नका राहू अवलंबून
बदलत्या जीवनशैलीमुळे फिट राहण्यासाठी सध्या प्रत्येक जण नवनवीन उपाय शोधताना दिसतो. त्यामुळे या विषयाच्या टिप्स देणारे असंख्य ॲप्स मोबाईलवर आले आहेत. मात्र, कोणत्याही ॲपच्या माहितीवर अवलंबून राहण्याचा फिटनेस फंडा महागात पडू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बहुतांश ॲपमधील माहिती प्राथमिक स्वरूपाची असते. त्यात प्रोग्राम्सनुसार व्यायामाचे प्रकार असतात. व्यायाम सुरू करण्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्याशिवाय दुसरा टप्पा ते सांगत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या शरीराची क्षमता किती आहे, हे त्या ॲपला माहीत नसते. तुम्हाला एखादा आजार, पूर्वीचे दुखणे असेल तर कोणता व्यायाम करावा, कोणता नको, हे ॲप सांगू शकत नाही. यासाठी प्रशिक्षकाचीच गरज असते. 

ॲपचे तोटे
 ॲपनुसारचा व्यायाम किंवा डाएटमुळे आलेली समस्या नोंदवता येत नाही.
 शरीररचनेनुसार व्यायामाचे प्रकार सुचविण्याची सोय ॲपमध्ये नाही.
 व्यायामाच्या अचूकतेचे मूल्यमापन होऊ शकत नाही.
 फिटनेस ॲप्स मार्गदर्शन करतात; प्रोत्साहन देत नाहीत.

व्यायाम करण्याच्या तीन स्टेप्स आहेत. त्या व्यक्ती व अनुभवानुसार ठरवल्या जातात. तसेच कुठल्या व्यक्तीला खांद्यात, मानेत किंवा कमरेत त्रास आहे, हे ॲप्लिकेशनला माहीत नसते. यातून चुकीची माहिती मिळाल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यासाठी ॲपपेक्षा ट्रेनरच्या मदतीनेच तरुणांनी परफेक्‍ट मार्गदर्शन घ्यावे.
- सुरेश भुबक, प्रशिक्षक.

शरीर तंदुरुस्त व आकर्षक दिसावे, यासाठी मी तीन वर्षांपासून जीममध्ये व्यायाम करतो. मला याचा खूप फायदा झाला. तरुणांनी योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यातच हित आहे.
- सागर हिवराळे

मी जीममध्ये दररोज एक तास नियमित जातो. 
सध्या चांगली थंडी पडू लागल्याने व्यायाम करताना छान वाटत आहे. मात्र, मी कुठलेही फिटनेस ॲप वापरत नाही.
- प्रवीण अंभोरे

थंडीमुळे सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा येतो. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत व्यायाम करणे शरीरासाठी आवश्‍यक झाले आहे. यामुळे आळस बाजूला सारून जीमला जाणे गरजेचे आहे.
- अपूर्वा निकाळजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com