esakal | कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्याचे सामुहिक रजा आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारित सेवाअंतर्गत अश्वासित प्रगती योजनेसह सातवा वेतन आयोग ताततडीने लागू करावा, यासह अन्य मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी म्हटले. सर्व अधिकारी - कर्मचारी सामुहिक रजेवर गेले. 

कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्याचे सामुहिक रजा आंदोलन

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः कृषि विद्यापीठातील अधिकारी कर्मचार्यांना अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेसहीत सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाणे लागू करावा, या मागणीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा  कृषी विद्यापीठाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता. सहा) सकाळपासून काळ्या फिती लावत एकदिवसीय सामुहिक रजा आंदोलन सुरू केले. 

अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारित सेवाअंतर्गत अश्वासित प्रगती योजनेसह सातवा वेतन आयोग ताततडीने लागू करावा, यासह अन्य मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी म्हटले. सर्व अधिकारी - कर्मचारी सामुहिक रजेवर गेले. 

हेही वाचाजिंतूर : नुकसान ३४ हजार हेक्टरचे तरीही पैसेवारी ५३ टक्के 

वसंतराव नाईक  कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने ता. 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांसमवेत झूम अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक आयोजीत केली. बैठकीमध्ये राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील अधिकारी - कर्मचार्‍यांनी सामाजीक आंतर राखून आंदोलन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आंदोलनात कृषि विद्यापीठातील सर्व अधिकारी - कर्मचार्‍यांनी ता. 27 ऑक्टोबर रोजी प्रशासकीय  इमारतीच्या प्रांगणामध्ये काळ्या फिती लावून प्रशासनास निवेदन दिले. त्यानंतर दि. दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर पर्यंत सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन केले. तर शुक्रवारी एकदिवसीय सामुहिक रजा आंदोलन करीत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला. शनिवारपासून (ता.सात) बेमुदत लेखणीबंद आंदोलन करणार आहेत, असाही इशारा निवेदनातून देण्यात आला.

या आंदोलनात विद्यापीठ समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे, डॉ.गजेंद्र लोंढे, डॉ.सचिन मोरे, डॉ.राजेश कदम, डॉ महेश देशमुख, डॉ रणजित चव्हाण, राम खोबे, सुरेश हिवराळे, कृष्णा जावळे, विश्वाभर शिंदे, आत्मराम कुरवारे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांसह अधिकारी कर्मचार्‍यांनी एकत्रित येत सहभागी झाले होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top