दिलासादायक; आठ योध्‍यांची कोरोनावर मात तर दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

जिल्ह्यात गुरुवारी (ता.नऊ) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात लिंबाळा कोअर सेंटर येथील तीन, औंढा चार तर वसमत येथील एक असे आठ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर हिंगोली येथे हैदराबादवरून आलेला व वसमत येथे एक असे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

हिंगोली ः जिल्ह्यात गुरुवारी (ता.नऊ) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात लिंबाळा कोअर सेंटर येथील तीन, औंढा चार तर वसमत येथील एक असे आठ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर हिंगोली येथे हैदराबादवरून आलेला व वसमत येथे एक असे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड अंतर्गत उपचार घेत असलेल्या ४३ वर्षीय तरुण हा शहरातील गांधी चौक येथील नातेवाईकांकडे आला असून तो हैदराबाद वरून गावी परतला आहे. तसेच वसमत क्वारंटाइन सेंटर येथील एका २५ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असून तो वापटी येथील रहिवासी आहे. तो मुंबई येथून गावी परतला आहे.

हेही वाचा - नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

आठ रुग्ण बरे 
गुरुवारी प्राप्त अहवालानुसार लिंबाळा येथील तीन रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये तालाब कट्टा एक, केंद्रा दोन, यांचा समावेश आहे. तर औंढा येथील कोअर सेंटर येथील चार रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यात औंढा दोन, भोसी दोन या रुग्णांचा समावेश आहे. तसेच वसमत येथील केअर सेंटर मधील रुग्ण बरा झाला आहे. असे एकूण आठ रुग्ण बरे झाले आहेत. तर दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे गुरुवारी जिल्हा प्रशासनाची चिंता दूर झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे ३१६ रुग्ण आढळून आले म्हणजेच त्रिशतकी आकडा पार केला आहे. त्यापैकी २७१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ४५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे डॉ. कुमार श्रीवास यांनी सांगितले.

उपचार सुरू असलेले रुग्ण 
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात एकूण अकरा कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून यात रिसाला एक, मकोडी एक, बहिर्जी नगर दोन, गांधी चौक तीन, जीएमसी नांदेड एक, पेडगाव एक, शुक्रवार पेठ दोन यांचा समावेश आहे. याशिवाय वसमत येथील केअर सेंटर येथे नऊ कोविड रुग्ण दाखल असून यामध्ये बहिर्जी नगर दोन,गणेश नगर एक, दर्गा पेठ एक,रिधोरा एक, टाकळगाव दोन, जयनगर एक, वापटी एक या रुग्णाचा समावेश आहे. तसेच कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे आठ रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये बाभळी एक, विकास नगर दोन, नवी चिखली तीन, डिग्रस एक, शेवाळा एक या रुग्णांचा समावेश आहे. तसेच लिंबाळा अंतर्गत सेंटर येथे बारा रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये तालाब कट्टा दोन, प्रगतीनगर एक, भांडेगाव तीन, पिंपळखुटा एक, हनवतखेडा एक, कळमकोंडा चार यांचा समावेश असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर सेनगाव येथे तिघांवर तर औंढा येथे दोघांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा - पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी नियोजन करा - अशोक चव्हाण

१९२ रुग्णांचे अहवाल येणे बाकी
जिल्हा आयसोलेशन वॉर्ड व कोरोना केअर सेंटर आणि गावपातळीवर भरती केलेल्या रुग्णात एकूण पाच हजार ५०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाच हजार ३० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चार हजार ७७२ रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ७२६ रुग्ण भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील १९२ रुग्णांचे अहवाल येणे बाकी असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

हिंगोली कोरोना मीटर 
एकूण पॉझिटिव्ह - ३१६
आजचे पॉझिटिव्ह - ०२
उपचार सुरू - ४५
उपचार घेत घरी परतले - २७१
एकूण मृत्यू - शून्य 
आजचे मृत्यू - शून्य

(संपादन ः राजन मंगरुळकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comforting; Eight warriors overcome corona while two new patients tested positive, hingoli news