
Maharashtra Politics: लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्त्यांची चाचपणी केली जात आहे. दरम्यान, सत्तेत असलेल्या भाजपकडून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी विविध समित्यांवर नियुक्ती दिली जात आहे, याच अनुषंगाने भोकरदन-जाफराबादचे आमदार संतोष दानवे यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णकल्याण कार्यकारी समिती व रुग्णकल्याण नियामक समितीच्या सदस्यपदी कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे.