सकाळ : मानवतेच्या संदेशावर आधारित प्रश्नांची द्या उत्तरे अन् जिंका बक्षिसे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

'सकाळ माध्यम समूह' आणि एसआयओतर्फे उपक्रम 

औरंगाबाद - प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी शांती, सलोख्याचा मार्ग दाखविलेला आहे. हा शांतीचा संदेश सर्वांना कळावा यासाठी कुराण आणि प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या शांतीच्या संदेशावर आधारित स्पर्धा 'सकाळ माध्यम समूह' आणि स्टुडंट्‌स इस्लामिक ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे 10 सप्टेंबर ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे कुपन 10 सप्टेंबरपासून प्रकाशित होणार आहेत. 

स्पर्धेत मानवता, एकात्मता, शांतीच्या संदेशावर आधारित मजकूर दिला जाणार आहे. हा मजकूर वाचून त्यातून रोज विचारल्या जाणाऱ्या एका सोप्या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. स्पर्धेच्या कालावधीत एकूण 45 प्रश्‍न विचारले जातील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना कमीत-कमी 40 प्रश्‍नांच्या उत्तराचे मूळ कुपन आवश्‍यक राहील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. यातील अचूक उत्तरे देणाऱ्यांना सर्व प्रश्‍नांचे कुपन एकत्र करून ठेवायची आहेत. स्पर्धा संपल्यानंतर सर्व कुपन जमा करण्यासाठी ठराविक कालावधी दिला जाईल. कुपन जमा करण्यासाठीचे काऊंटर सेंटर स्पर्धेनंतर लगेच जाहीर करण्यात येतील. 
 
आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी 
स्पर्धेत कमीत-कमी 40 प्रश्‍नांची अचूक उत्तर असलेल्या कुपनची एकत्रित करून सोडत काढली जाणार आहे. यामध्ये विजेत्यांना प्रथम पारितोषिक 31, द्वितीय 21, तृतीय 11 हजारांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. चतुर्थ बक्षीस 100 ट्रॅव्हल्स बॅग, उत्तजनार्थ 300 आकर्षक बक्षिसे राहणार आहेत. 
   
स्पर्धेच्या अधिक माहिती व 'सकाळ'चा अंक सुरू करण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क करा : 
औरंगाबाद- 9075006912, 9168814465, जालना- 9822910897, नांदेड- 9850993891, बीड- 9922920520, लातूर- 9822014900, उस्मानाबाद- 9423829785, परभणी- 9850698109, हिंगोली- 8830529600 
 

अशी असेल स्पर्धा

  • स्पर्धेचा कालावधी 10 सप्टेंबर ते 26 ऑक्‍टोबर 
  • स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली राहील 
  • ही स्पर्धा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी असेल 
  • प्रथम पारितोषिक 31, द्वितीय 21, तृतीय 11 हजारांचे पारितोषिक 
  • चतुर्थ बक्षीस 100 ट्रव्हल्स बॅग, उत्तजनार्थ 300 आकर्षक बक्षिसे 
  • कुराण आणि प्रेषित मोहंमद पैगंबरच्या शांतीच्या संदेशावर रोज एक प्रश्‍न विचारला जाणार 
  • स्पर्धेच्या कालावधीत एकूण 45 प्रश्‍न विचारले जातील 
  • 45 प्रश्‍नांपैकी कोणत्याही 40 प्रशांच्या उत्तरांचे कुपन आवश्‍यक 
  • अचूक उत्तरे देणाऱ्यांचे कुपन एकत्र करून सर्वांसमोर सोडत काढली जाईल 
  • प्रश्‍न व उत्तराचे मूळ कात्रण चिकटविणे आवश्‍यक, झेरॉक्‍स ग्राह्य धरली जाणार नाही  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competition based on the message of humanity