शिवसेनेकडून हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी, पोलिसांकडे तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

औरंगाबाद - शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुखांना उद्देशून निवडणुकीच्या जाहीर सभेत असभ्य शब्दप्रयोग करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी अशी शिवसेनेच्यावतीने पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे तर औरंगाबाद पुर्व विधानसभा मतदार संघाचे संघटक नगरसेवक राजू वैद्य यांनी पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दिली आहे. 

हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालूक्‍यातील चिंचोली येथील जाहीर सभेत अतिशय खालच्या पातळीवर जाउन शिवसेना पक्षाला आणि पक्षप्रमुखांना उद्देशून " सत्तार तुमच्या आईचा नवरा आहे काय ' असे उदगार काढून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून शिविगाळ केली व जातीय भावना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे शिवसैनिकांत संतापाची लाट निर्माण झाल्याने कन्नड विधानसभा मतदार संघात कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होउ शकतो. श्री. जाधव यांना निवडणुकीत अपात्र ठरवून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना नेते श्री. खैरे यांच्यासह महापौर नंदकुमार घोडेले, युवा सेनेचे राजेंद्र जंजाळ, सुनीता आउलवार, विश्‍वनाथ स्वामी , कला ओझा, सुनीता देव यांचा शिष्टमंडळात समावेश होता. 

पोलिस स्टेशनमध्येही तक्रार 

अशाच प्रकारे पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये शिवसेनेचे पूर्व विधानसभा मतदार संघ संघटक तथा नगरसेवक राजू वैद्य यांनीही सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांच्याकडे बुधवारी (ता.16) तक्रार दिली. त्यात राजू वैद्य यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव कन्नड तालूक्‍यातील चिंचोली या गावी मंगळवारी (ता.15) जाहीर सभेत शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख यांना उद्देशून असभ्य भाषाप्रयोग करुन शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint by  Shiv Sena to Collector  against Harshavardhan Jadhav