esakal | कोरोना टेस्टचा रिपोर्ट नसलेल्या शिक्षकांबाबत मुख्याध्यापकांसमोर पेच 
sakal

बोलून बातमी शोधा

03

एकीकडे शासनाने शिक्षकांसाठी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली असू चाचणी केल्याशिवाय शिक्षक, कर्मचाऱ्यांना काय अन्य व्यक्तींनाही प्रवेश देऊ नये अशा मुख्याध्यापकांना सूचना आहेत. मात्र, परभणी जिल्ह्यात टेस्ट केलेल्या अनेक शिक्षकांचे अहवाल अद्याप न आल्याने मुख्याध्यापकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

कोरोना टेस्टचा रिपोर्ट नसलेल्या शिक्षकांबाबत मुख्याध्यापकांसमोर पेच 

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

परभणी ः आरटीपीसीआर टेस्ट व त्याचा अहवाल प्राप्त होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार असून शाळा सुरू होण्यापूर्वी हे अहवाल मिळणे अशक्य झाले आहे. सोमवार (ता.२३) शाळा, महाविद्यालये सुरु होणार असून टेस्टचा रिपोर्ट नसलेल्या शिक्षकांबाबत कोणता निर्णय घ्यावा हा पेच शाळा व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे. 

एकीकडे शासनाने शिक्षकांसाठी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली असू चाचणी केल्याशिवाय शिक्षक, कर्मचाऱ्यांना काय अन्य व्यक्तींनाही प्रवेश देऊ नये अशा मुख्याध्यापकांना सूचना आहेत. जिल्ह्यात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या दहा ते १२ हजार असण्याची शक्यता असून त्यापैकी निम्म्या जणांनी जरी चाचण्या केल्या तरी त्यांना सोमवार पर्यंत टेस्ट रिपोर्ट मिळणे अशक्य आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे बहुतांश शिक्षक कोरोणाच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेत आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी बहुतांश कर्मचाऱ्यांचे टेस्ट रिपोर्ट मिळणे अशक्य आहे. त्यामुळे जिल्हा शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनास वस्तुस्थिती अवगत करून द्यावी. त्यावर प्रशासनाने देखील सर्वसमावेशक व धोरणात्मक निर्णय तत्काळ घेणे गरजेचे आहे. 

क्षमता कमी स्वॅब जास्त 
आरटीपीसीआर टेस्ट केल्यास त्याचा रिपोर्ट येण्यास किमान २४ ते ३६ तास लागतात. जिल्हा शासकीय रुग्णालयात एका दिवसात दोनशे व असून अधिकाधिक तीनशे टेस्ट रिपोर्ट तयार होऊ शकतात. परंतू, सध्या टेस्टची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात दररोज एक हजार शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहेत. आत्तापर्यंत तीन दिवसात जवळपास तीन हजार शिक्षकांनी या टेस्ट केल्या असून (ता.१८) नोव्हेंबर पर्यंतचे बहुतांश रिपोर्ट देण्यात आलेले आहे. परंतु आता स्वॅबची संख्या वाढल्यामुळे औरंगाबाद व नांदेड येथील प्रयोगशाळेत स्वॅब पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती या विभागाचे प्रमुख डॉ. किरण सगर यांनी दिली. 

हेही वाचा - जयसिंग व धनंजय मधला जय, गोपीनाथ आणि एकनाथामधील नाथ हा भाजपच्या नेतृत्वाला नको होता

मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच 
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये होण्यापुर्वी सर्व शिक्षकांचे आरटीपीसीआर रिपोर्ट मिळणे अशक्य आहे. एकीकडे शासनाचे आदेश व दुसरीकडे चाचणी अहवाल प्राप्त न झाल्यामुळे मुख्याध्यापकांपुढे मोठा पेच आहे. उस्मानाबाद येथील एकाच शाळेतील २० शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे देखील समोर आले आहे. तर कोरोनाची दुसरी लाट येण्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांनी रिपोर्ट न आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना शाळेत प्रवेश दिला व त्यामध्ये एखादा कोरोना बाधित झालेला असला तर विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा फैलावाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

हेही वाचा - महाविकास आघाडीच्या उमेदवाराची वंचितने वाढवली डोखेदुखी

जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याच्या निर्णयासाठी आज बैठक 
परभणी ः शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबतच निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याच्या सूचना केल्यानंतर जिल्हा प्रशासन देखील शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची शक्यता असून रविवारी (ता.२२) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे अतिशय संवेदनशील आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. वेळोवेळी संचारबंदी लागू करणे असो की अनलॉकच्या काळात विविध आस्थापना खुल्या करण्याचा निर्णय असो. प्रत्येक निर्णय त्यांनी विचारपूर्वक व संयमाने घेतला आहे. शाळा सुरू करण्याच्या आदेशानंतर देखील त्यांनी जिल्हा शिक्षण विभागासह मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते; परंतु आता शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडल्यामुळे व कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळत असल्याने याबाबीचा जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर गांभीर्याने विचार करण्याची शक्यता आहे. रविवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (मा.) डॉ. वंदना वाहूळ यांनी दिली. या बैठकीत जिल्ह्यात शाळा सुरू कराव्यात की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. शाळा सुरू करण्याबाबत महापालिकेचे आयुक्त देविदास पवार म्हणाले, की स्थानिक परिस्थितीसह जिल्ह्यातील परिस्थितीची जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे तो जे निर्णय घेतील, त्याची महापालिका क्षेत्रात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.

संपादन ः राजन मंगरुळकर