हिंगोलीत कोरोना लसीची रंगीत तालिम पुर्ण 

राजेश दारव्हेकर
Friday, 8 January 2021

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेद्र सूर्यवंशी यांचे नियंत्रणात लसीकरणास सुरुवात करण्यात आली.

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड-१९ लसीकरणाची रंगीत तालिम शुक्रवारी (ता. आठ) यशस्वीरीत्या पुर्ण करण्यात आली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेद्र सूर्यवंशी यांचे नियंत्रणात लसीकरणास सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम पोलिस विभागाचे प्रतिनिधी यांनी प्रथम लस घेणाऱ्या सर्व लाभार्थीची सॉप्टवेअर नोंदणी प्रमाणे पॅन कार्ड पडताळणी करण्यात आली. नोंदणी प्रमाणे पॅनकार्ड खात्री झाल्यानंतर संबंधीताना कोवीड अॅपमध्ये लाभार्थीची नोंदणी करुन लस देण्यात आली. आजच्या ड्रायरन ( रंगीत तालिम ) मध्ये एकुण २५ लाभार्थी यांना लस देण्यात आली. यानंतरचे लसीकरण सत्र हे शासनाचे आदेशानुसार वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी सांगितले.

हेही वाचाबिबट्याचे पुन्हा दर्शन, श्वानावर केला हल्ला, हिंगोलीच्या कांडली शिवारात घबराट

लसीकरणानंतर घरी सोडण्यात आले

लस देण्यात आलेल्या लाभार्थीना डॉक्टरांच्या निगराणीखाली अर्धातास ठेवण्यात आले. दरम्यान यांचे पल्स ऑक्सीजन, बी. पी, शुगर आदी चाचण्या करण्यात येऊन स्थिती ठिक असल्याची खात्री करुण कोणताही त्रास नसल्याचा खात्री केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. तसेच लसीकरणाचा लाभ घेतलेल्या व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवरती त्यांचे लसीकरण यशस्वीरित्या झाल्याचा संदेश कोवीड अॅपद्वारे पाठविण्यात आले. 

नांदेड जिल्ह्यातील अधिकच्या घटना घडामोडी 

यांनी घेतले परिश्रम

या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ मंगेश टेहरे, डॉ. रविंद्र जायभाये, डॉ. दिपक मोरे, डॉ. अजहर देशमुख, डॉ. इनायततूला खान, रेवती पिंपळगांवकर, डॉ. नविद अथर, ज्योती पवार, सय्यद इम्रानअली, भीमराव खेबाळे तसेच सर्व  एएनएम, आशा उपस्थित होते. कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालीमच्या यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी यानी पुढाकार घेतला.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete training of corona vaccine in Hingoli