Maharashtra Farmer Loan Waiver
esakal
- संतोष निकम
कन्नड - 'अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'च्या दुसऱ्या यादीत कन्नड तालुक्यातील १९७ गावांतील २ हजार ५०५ शेतकरी पात्र ठरले आहेत. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचे २ हजार ८०, तर विविध कार्यकारी सोसायट्यांचे ४२५ शेतकरी पात्र झाले आहेत. दरम्यान, जेहूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांची नावे दुसऱ्या यादीत आढळून आली नसल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीच्या पात्रतेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.