धिरज देशमुख रुग्णालयात... म्हणाले, तुम्ही आहात, म्हणून मी आहे!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

लातूर ग्रामीण मतदारसंघातून धिरज देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. तर, लातूर शहरमधून त्यांचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही भावांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुखही मैदानात उतरला आहे. तो सध्या त्याच्या भाषणांमुळे चर्चेत आला आहे.

लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे पुत्र धिरज देशमुख हे सध्या आजारी असून, गेल्या दोन दिवसांपासून ते प्रचारापासूनही दूर आहेत. 

लातूर ग्रामीण मतदारसंघातून धिरज देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. तर, लातूर शहरमधून त्यांचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही भावांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुखही मैदानात उतरला आहे. तो सध्या त्याच्या भाषणांमुळे चर्चेत आला आहे. पण, आता धिरजच्या आजारपणामुळे त्याच्या प्रचाराची जबाबदारी रितेशवरच असल्याचे बोलले जात आहे.

धिरज देशमुख यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित म्हटले आहे, की कोणत्याही लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसते. मागील दोन-तीन दिवसांपासून अंगात थोडासा ताप होता, पण प्रचार सभांच्या व्यस्ततेमुळे तब्येतीकडे जरा दुर्लक्षच झाले. शेवटी नाईलाजाने काल लातूरमध्येच रुग्णालयात अॅडमीट व्हावे लागले आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे सध्या तापाच्या आजाराचे प्रमाण सगळीकडे वाढले आहे. सध्या मी उपचार घेत असून आता प्रकृती सुधारते आहे. काळजी करावी असे कांहीं नाही. माझे जिवाभावाचे कार्यकर्ते, हितचिंतक व आपण सर्वजण माझ्यासाठी प्रचार करत आहात.या दरम्यान आपण देखील तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या शुभेच्छा आणि स्नेहाच्या बळावर मी लवकरच बरा होवून आपणासोबत प्रचारात सहभागी होईन हा विश्वास मला आहे. माझ्या अनुपस्थितीत आपण प्रचाराचे कार्य जोमात सुरू ठेवल्याबद्दल मी आपले शतश: आभार व्यक्त करू इच्छितो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress candidate Dhiraj Deshmukh admit in hospital at Latur