Viral Video : गुलालाचा नाद! काँग्रेसच्या उमेदवाराने काढली JCBतून मिरवणूक

Video
VideoSakal
Updated on

लातूर : राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींचे निकाल आज पार पडले. त्यामध्ये भाजप, शिवसेनेचा शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सहित अनेक लहानमोठ्या पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. तर अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांनी वेगवेगळ्या प्रकारांनी आपला विजयी जल्लोष व्यक्त केला आहे.

हेही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

लातूर मधील निलंगा येथील ग्रामपंचायतीवर तिसऱ्यांदा काँग्रेसचे लाला पटेल यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. एकूण १७ जागेपैकी १३ जागा निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांना जेसीबीत बसून विजयोत्सव साजरा करत मिरवणूक काढण्यात आली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, औरंगाबाद येथील बिडकीन ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने विजय मिळवला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी पैशांची उधळण करत विजयी जल्लोष साजरा केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. तर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी डान्स करत आपल्या विजयाचा जल्लोष साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pitbull attacks husband and wife in shocking dog attack incident
Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls
Social activist Sachin Chavan withdrew his indefinite hunger strike after the administration assured in writing that the alleged financial irregularities in Adul Gram Panchayat would be investigated and a report submitted within 15 days
Social activist Sachin Chavan has launched an indefinite hunger strike outside the Adul Gram Panchayat office in Paithan taluka, demanding an impartial inquiry into alleged financial irregularities and action against those found responsible.
Marathi News Esakal
www.esakal.com