congress party march on tahsil office
sakal
फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या देत जोरदार निदर्शने केली. 'मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा', 'अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या', 'भाजप सरकार हाय हाय' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले.