Jalkot News : पं. स. सभापतीपदी काँग्रेसच्या सुनिता कोसबे तर उपसभापती माधव वाघमारे यांची निवड

जळकोट पंचायत समितीच्या नवव्या सभापती म्हणून काँग्रेसच्या सुनिता संभाजी कोसबे तर उपसभापती काँग्रेसचे माधव जळबा वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली.
Sunita Kosbe and madhav waghmare

Sunita Kosbe and madhav waghmare

sakal

Updated on

जळकोट - पंचायत समितीच्या नवव्या सभापती म्हणून काँग्रेसच्या सुनिता संभाजी कोसबे तर उपसभापती काँग्रेसचे माधव जळबा वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली.

पंचायत समितीच्या सभागृहात पिठासीन अधिकारी तहसीलदार राजेश लांडगे व गटविकास अधिकारी नरेंद्र मेडवार यांच्या उपस्थित पंचायत समितीच्या सदस्यांची बैठक झाली. बैठकीत सभापती व उपसभापतीसाठी प्रेतकी एक, एक अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी राजेश लांडगे यांनी सभापती व उपसभापतीपदाची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com