मध्यमवर्गीयांची विश्‍वासार्हता घसरल्याने परिणाम

जयदेव डोळे : प्रसारमाध्यमांच्या विश्‍वासार्हतेवर परिसंवाद
aurangabad
aurangabad sakal

औरंगाबाद : ‘स्वातंत्र्य, लोकशाहीसाठी लढा देणार्या मध्यमवर्गाची विश्‍वासार्हता आज घसरली आहे. तो भ्रष्ट,जात्यंध, धर्मांध, भक्त झाला आहे. तो निष्ठावंत नसल्याचे एका विशिष्ट विचारसरणीकडे वळला आहे. त्यांची विश्‍वासार्हता विचलीत झाल्यामुळे माध्यमांकडून अपेक्षा कशी करणार’, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत जयदेव डोळे यांनी अध्यक्षीय समारोपात उपस्थित केला.

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनात ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर आली आहे..!’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर पाटील, उस्मानाबादचे रविंद्र केसकर व नांदेडचे प्रा. वैजीनाथ अनमुलवाड यांची आपली मते मांडली. श्री. डोळे म्हणाले, ‘‘आपल्या भवतालचे राजकारण, समाजकारण व शासनही विश्‍वासार्ह राहिले नसल्यामुळे माध्यमे कशी विश्‍वासार्ह राहतील.

माध्यमांची विश्‍वासार्हता ही मध्यमवर्गीयांशी निगडीत आहे. त्या वर्गाने भूमिका केव्हाच सोडली आहे. मध्यमवर्ग हाच राज्य व प्रशासनाचा भाग बनला आहे. सर्वच संस्थांचे राजकीयीकरण होत अधोगतीकरण झालेले आहे. मग पत्रकारिता तरी कशी विश्वासार्ह राहील. सध्या कोरोनाच्या भयाने अनेकांनी वृत्तपत्र घेणेही बंद केले.

अशा व्यवस्थेत सत्य कुठे तरी लपून बसले आहे. महत्वाच्या सत्य घटना, पहिल्या पानावर न येता आतील पानांवर, कुठेतरी कोपर्यात जात आहेत. अशा परिस्थितीत देशात अस्वस्थच वातावरण राहील. ते तसेच राहावे अशी सत्ताधार्यांची इच्छा आहे. ही कसली राज्यघटना, ही कसली लोकशाही? आता आम्हाला आमच्या मतांप्रमाणे आमची व्यवस्था निर्माण करायची आहे. आपला भवताल संकुचित होत चालला आहे. तेव्हा मध्यमवर्गाने या सत्ताधार्यांविरूध्द लढायला हवे. सत्यच शून्यामध्ये परावर्तीत व्हायला लागले तर अवघड आहे. तेव्हा प्रसारमाध्यमे व मध्यमवर्गाने पुन्हा उभे राहायला हवे.’’

aurangabad
छेडछाडप्रकरणी आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास

ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर पाटील म्हणाले, ‘‘काही प्रमाणात प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कमी झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका पाहणीनुसार छापील माध्यमांची विश्‍वासार्हता ६२ टक्के अशी आहे. त्यातही प्रादेशिक पातळीवरची माध्यमे त्यांची विश्‍वासार्हता टिकवून आहेत. यामुळेच बीडमधील डॉ. सुदाम मुंडेना शिक्षा होऊ शकली. आज चार प्रकारची माध्यमे दिसतात. एक विकलेले, दुसरे झुकलेले, तिसरे टिकलेले आणि चौथे म्हणजे सुकलेले. जर लोकशाही सुदृढ करायची असेल आणि माध्यमांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर सुकलेल्या माध्यमांना खतपाणी घालणे गरजेचे आहे.’’

रविंद्र केसकर म्हणाले, ‘‘चांगली माध्यमे टिकावीत, असे अनेकांना वाटते, मात्र त्यासाठी काम करणारे कमी आहेत. माध्यमांवर टीका करताना तिथे काम करणाऱ्यांचे मानधन बघावे, पत्रकारांनाही भावना, गरजा, कुटुंब असतं हे समजून घेतलं पाहिजे. वरकरणी प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शून्यावर आली असली तरी अनेक नवसमाजमाध्यमे मुख्य माध्यमांनी दडपलेल्या बाजू किंवा सत्य उलगडण्यासाठीचे काम करत आहेत.त्यांना लोकांनी आश्रय देण्याची गरज आहे.’’

प्रा. वैजनाथ अनमुलवाड म्हणाले, ‘‘माध्यमांमधील सामाजिकता कमी झाली आहे. वंचित घटकांपर्यंत पोहचत त्यांच्या प्रश्‍नाला वाचा फोडण्याची जबाबदारी माध्यमांनी झटकली टीका आहे. मनोहर शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले तर आशा डांगे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com