container accident
sakal
कायगाव - छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर महामार्गावरील गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळील शिवना नदीच्या पुलावर गुरुवारी (ता. ३० ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास कंटेनरने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनर चालक प्रज्वल आंधळे गंभीर जखमी झाला असून, त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. अपघातानंतर तो तब्बल अर्धा तास कंटेनरच्या केबिनमध्ये अडकून पडला होता.