Hingoli Rain : हिंगोलीत दुसऱ्या दिवशी पाऊस, पिकांना जीवदान

हिंगोली - जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.
हिंगोली - जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. सकाळ

हिंगोली : जिल्ह्यात (Hingoli) बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर दोन दिवसांपासून पावसाचे आगमन झाल्याने सुकत असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मंगळवारी (ता.१७) आज सकाळी आठवाजेपर्यंत १७. ६० मिलिमीटर पावसाची (Rain) नोंद झाली आहे. दुपारी बारा वाजेपर्यत सूर्यदर्शन झाले नव्हते. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत आज सकाळी आठ वाजेपर्यंत १७.६० मिलिमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे मिलिमीटरमध्ये; हिंगोली तालुका २२.४०, कळमनुरी (Kalamnuri) २१.२०, वसमत (Vasmat) १५.९०, औंढा नागनाथ (Aundha Nagnath) १२.३०, सेनगाव (Sengaon) १४.१० पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ७५ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील आश्लेषा नक्षत्र कोरडे गेले होते. सोमवारपासून मघा नक्षत्रास सुरुवात झाली आहे. या नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन झाले आहे.

हिंगोली - जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.
'मोदी आत्ममग्न नेतृत्व, सर्वकाही मीच करतो हे दाखविण्याचा प्रयत्न'

जिल्ह्यात वीस ते बावीस दिवस पावसाने ओढ दिल्याने पिके सुकत होती. वाढते तापमान कोवळ्या पिकांसाठी धोकादायक ठरत चालले होते. सध्या सोयाबीन, मूग ही पिके शेंगा धरत आहेत. त्यामुळे या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने पिकांची परिस्थिती नाजुक झाली आहे. या पावसाने पिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र मोठ्या पावसाची अपेक्षा असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सोमवारी भल्यापहाटेपासून सकाळी सात वाजेपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. मंगळवारी देखील मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सकाळी नऊ वाजेपर्यंत रिमझिम सुरू होता. त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले दुपारी बारापर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते. अधुन-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान या पावसाने सुकत असलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांची कळा बदलली असून टवटवीत पिके दिसत आहेत. मात्र शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com