PM SHRI School Construction Incomplete Work
sakal
निलंगा - प्रधानमंत्री स्कूल फाँर रायझिंग इंडिया (Pradhan Mantri Schools for Rising India) ही भारत सरकारची एक महत्त्वाची शाळा विकास योजना असून या योजनेअंतर्गत देशातील निवडक सरकारी शाळांचा कायापालट करून त्यांना 'मॉडेल शाळा' म्हणून विकसित केले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे शिक्षण आणि सर्वसमावेशक वातावरण मिळू शकेल असा केंद्र सरकारचा उद्देश असताना निलंगा शहरातील (पेठ-निलंगा) येथील ‘पीएम श्रीसाठी निवडलेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारती अभावी गैरसोय झाली आहे.