esakal | कोरोना काळातील सामाजिक सद्भावना, सलोखा राखण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे- नवाब मलिक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

डॉ. अशोक जोंदळे व आशाताई जोंधळे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

कोरोना काळातील सामाजिक सद्भावना, सलोखा राखण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे- नवाब मलिक

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जे धार्मिक सलोखा राखून एकात्मतेचे दर्शन दाखविले, सदभावना दाखविली ती अत्यंत मोलाची आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी प्रशासनाला कठोर निर्बंध लावणे अत्यावश्यक होते. हे निर्बंध जनतेने अत्यंत शांततेने पाळून दाखविले. अशा या कठिण काळात गोरगरिबांच्या मदतीसाठी परभणीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. या शब्दात पालकमंत्री नवाब मलिक यांनी गौरव केला.

येथिल ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित सदभावना संमेलन व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा़. गणेशराव दुधगावकर हे तर प्रमुख पाहुणे म्हणून खा़. डॉ.फौजिया खान, माजी खा़. तुकाराम रेंगे, माजी खा़. सुरेश जाधव, नदीम इनामदार, किरण सोनटक्के, अरूण मराठे यांची उपस्थिती होती़ परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते अजमत खान यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते.

हेही वाचापरभणी : सेलू बाजार समितीच्या प्रशासकपदासाठी अनेकांची फिल्डींग

पुढे बोलताना ते म्हणाले की, परभणीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी जनतेचा रेटा पाहता लवकरच वैद्यकीय महाविद्यालय स्थापना होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून लवकर महाविद्यालय सुरू होईल असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना मलिक म्हणाले की, पाथ्री येथील साई मंदिराचा जर पुर्णपणे विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल. त्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही ही त्यांनी दिली. शहरातील सद्भावना व एकोप्याचे त्यांनी कौतुक केले.  यावेळी बोलताना खा.फौजिया खान म्हणाल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. पालकमंत्री मलिक यांना जी-जी मदत लागेल ती-ती मदत आपण करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगत संयोजक अजमत खान यांच्या कार्याचे कौतुक केले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अजमत खान यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करीत अजमत खान यांना लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ़ अशोक जोंधळे व आशाताई जोंधळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आला.  तसेच पत्रकारिता करीता दर्पण पुरस्कार, वैद्यकीय क्षेत्रासाठी  वैद्यकीयरत्न व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाजया मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात आला़  प्रास्ताविक संयोजक अजमत खान यांनी केले़ मानपत्राचे वाचन प्रवीण वायकोस यांनी केले़ तर  सुत्रसंचालन डॉ. मुनिब हानफी  यांनी केले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image