esakal | ग्राहक विश्वास संपादनासाठी सहकाराला संस्काराची जोड हवी
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

Nanded : ग्राहक विश्वास संपादनासाठी सहकाराला संस्काराची जोड हवी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सहकार क्षेत्रातील सर्वच संस्थांनी आपल्या ग्राहकांना संस्थेविषयी सुरू असलेले कामकाज, व्यवहार, उपक्रम व आगामी संकल्प याबाबत वेळोवेळी तपशीलवार आणि सखोल मार्गदर्शन करावे. यातून ग्राहकांच्या मनात सहकारासोबतच संस्काराची बिजे पेरली जाऊन तीच बिजे ग्राहकांचा विश्वास संपादन करतील त्यासाठी ग्राहक विश्वास संपादनासाठी सहकाराला संस्काराची जोड हवी असे मत राजश्री पाटील यांनी व्यक्त केले.

राज्य फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे शुक्रवारी (ता. एक) सहकार प्रशिक्षण संशोधन केंद्राच्या वतीने संचालक व व्यवस्थापक प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. या वेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ऍड. विद्याधरजी अनास्कर व बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते राजश्री पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कार्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, महासचिव शांतीलाल शिंगी, दादाराव तुपकर, सुरेखा लवांडे यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबिरास गोदावरी अर्बनच्या उपाध्यक्ष हेमलता देसले, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सचिव ॲड. रवींद्र रगटे, संचालक प्रा. सुरेश कटकमावर, प्रसाद महल्ले मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे यांच्यासह शाखा व्यवस्थापक व अधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top