Farmer Success : एक एकर कोथिंबिरीतून दीड लाखाचे उत्पन्न; वडीगोद्री येथील शेतकरी संतोष आटोळे यांनी एक महिन्यात साधली किमया
Organic Farming : वडीगोद्री येथील शेतकरी संतोष आटोळे यांनी अवघ्या ३२ दिवसांत एक एकर कोथिंबिरीतून दीड लाखांचे उत्पन्न घेतले. टँकरने पाणीपुरवठा व सेंद्रिय पद्धतीने शेती करून त्यांनी हे यश मिळवले.
वडीगोद्री (ता. अंबड) : येथील शेतकरी संतोष बबनराव आटोळे यांनी कडक उन्हाळ्यात एक एकर जमिनीत कोथिंबिरीची लागवड करून दीड लाखाचे उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे टँकरने पाणीपुरवठा व सेंद्रिय खतांचा वापर करून ३२ दिवसांत त्यांनी ही किमया साधली आहे.