esakal | कोरोना ब्रेकींग : 110 जवान कोरोना बाधित; येलकी येथील सशस्त्र सीमा बल येथील चाचणी अहवाल

बोलून बातमी शोधा

ssf

कोरोना ब्रेकींग : 110 जवान कोरोना बाधित; येलकी येथील सशस्त्र सीमा बल येथील चाचणी अहवाल

sakal_logo
By
सय्यद अतीक

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बल या बटालियनमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या ३१२ जवान पैकी एकशे दहा प्रशिक्षणार्थी जवानाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सावंत यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आखाडा बाळापुरपासून जवळ असलेल्या येलकी शिवारामध्ये सशस्त्र सीमा बलाचे प्रशिक्षणार्थी जवान येथे उभारण्यात आलेल्या सीमा बलाच्या इमारतीत राहतात. येथे नुकतेच ३१२ जवान प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. या जवानांची मंगळवारी (ता. २७) तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख रोफ यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सावंत, डॉ. अजित धोंडे, समुदाय अधिकारी डॉ. नरेंद्र थोरात, डॉ.जगदाळे, डॉ. शरद पाटील यांनी सदरील ठिकाणी जाऊन ३१२ जवानाची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यापैकी २८२ जवानांचा आरटीपीसीआर अहवाल शुक्रवारी (ता. ३०) आला असून त्यामध्ये ११० प्रशिक्षणार्थी जवान करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा - धक्कादायक प्रकार : जात पंचायतीची महिलेला पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा!

तर ३३ जवानांचा अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान ११० प्रशिणार्थी जवानांना कळमनुरी येथील शासकीय वस्तीगृहात उपचारासाठी शुक्रवारी दाखल करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. आता ३३ जवानांचा अहवाल काय येतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गावापासून सीमा सुरक्षा बलाची इमारत हिंगोली ते नांदेड रस्त्यालगत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे