Corona Breaking ; परभणीत एकाच दिवशी आढळले ८२ नवे रुग्ण

corona
corona

परभणीः जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता एक हजाराकडे झेपावला आहे. शुक्रवारी (ता.सात) दिवसभरात ८२ नवे रुग्ण सापडले आहेत. ऐवढे मोठे रुग्ण सापडण्याचा ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१५ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४४० रुग्णांना कोरोनामुक्तीमुळे सुट्टी देण्यात आली आहे. तर ४२७ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ४८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. शुक्रवारी (ता.सात) ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज २९ रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

महापालिकेने शुक्रवारी घेतलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये १३ व्यापारी तर कोविड पोर्टलवर ३५ असे दिवसभरात ४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. सिटी क्लब, उदेश्वर विद्यालयात शहरातील व्यापारी, विक्रेत्यांसाठी रॅपिड केंद्र सुरू केले आहे. आज तेथे शुक्रवारी २३ व्यापाऱ्यांची तपासणी झाली. त्यात १३ कोरोनाबाधित आढळले. पथ विक्रेते, भाजीपाला, मटन विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांनी १५ ऑगस्टपर्यंत रॅपिड टेस्ट करून घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. तसे प्रमाणपत्र असल्याशिवाय दुकाने उघडता येणार नाहीत, असा इशारा आयुक्त देविदास पवार यांनी दिलेला आहे. 

जिंतूरला एकाच दिवशी सहाजण पॉझिटिव्ह 
जिंतूर ः शहरातील संभाजीनगरमध्ये समाजकल्याण सभातीच्या कुटुंबातील चार सदस्य, गवळी गल्लीतील एक व तालुक्यातील अकोली येथील एक असे सहाजण शुक्रवारी (ता.सात) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर शहरातीलच साबूणबेस परिसरातील एक साठवर्षीय ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे परभणीच्या रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती व त्यांच्या सौभाग्यवती तथा नगरसेविका काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यांच्या कुटुंबातील एकूण बारा सदस्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. सर्वांची शुक्रवारी (ता.सात) रॅपिड टेस्ट घेण्यात घेण्यात आली. त्यात ७० वर्षीय पुरुष, ६५ व ३५ वर्षीय महिला, तीनवर्षीय मुलगा पाझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर गवळी गल्लीतील एक ४२ वर्षीय पुरुष तसेच तालुक्यातील अकोली येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोरिना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तर शहरातील साबूणबेस परिसरातील एका ६० वर्षीय महिलेची प्रकृती खराब असल्याने त्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांचा कोरोना टेस्ट करण्यासाठी स्वॅब घेण्यात आला; परंतु त्याचा अहवाल येण्यापूर्वी शुक्रवारी (ता.सात) सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्या पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दुपारी एक वाजता प्राप्त झाला. गवळी गल्ली, साबूणबेस व अकोली येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची नावे शोधण्याचे काम सुरू असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.रविकुमार चांडगे यांनी सांगितले. 

परभणी जिल्हा 
एकूण पॉझिटिव्ह ः ९१५
आजचे पॉझिटिव्ह ः ८२
आजचे मृत्यु ः शून्य
एकूण बरे रुग्ण ः ४४०
उपचार घेणारे रुग्ण ः ४२७
एकूण मृत्यु ः ४८

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com