esakal | Corona Breaking, हिंगोलीचे जिल्हाधिकारी पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. याबाबत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Corona Breaking, हिंगोलीचे जिल्हाधिकारी पॉझिटिव्ह

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली ः जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. याबाबत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र, अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याने जिल्हा कचेरीतील कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयात जावे किंवा नाही याची धास्ती लागली आहे.

मागील तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ यांना कोरोना झाल्याचे स्पस्ट झाल्याने जिल्हा परिषदेमध्ये सॅनिटाईझ करून तीन दिवस कामकाज बंद ठेवले आहे. या अधिकाऱ्याला कोरोना बाधा झाल्याची घटना ताजी असताना त्यापाठोपाठ कोरोना विषाणूने जिल्हा कचेरीतील बड्या अधिकाऱ्याला देखील सोडले नाही.

उद्यापासून जिल्ह्यात लॉकडाउन
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवारपासून चौदा दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. आता तर बड्या अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.
जिल्हा कचेरीतील कलेक्टर यांचे स्वॅब नमुने सोमवारी घेतले होते. त्याचा अहवाल बुधवारी आरोग्य यंत्रणेकडे प्राप्त होताच हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा - तिसऱ्या प्रयत्नात अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झळकला युपीएससीत

कर्मचारी बसले कार्यालयाबाहेर मोकळ्या जागेत 
बुधवारी नेहमीप्रमाणे जिल्हा कचेरीत कर्मचारी हजर झाले. मात्र त्यांना देखील साहेबाला कोरोना लागण झाल्याची कुणकुण लागल्याने सर्व विभागातील कर्मचारी कार्यालयात न जाता भीतीने एक वाजेपर्यंत बाहेर मोकळ्या जागेत बसल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता जिल्हा कचेरीत कोरोना रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण इमारत सॅनिटाईझ करणे अपेक्षित होते. मात्र इमारत सॅनिटाईझ करण्यात आली नाही. हा हलगर्जीपणा कोणाच्या पथ्यावर पडणार काही कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषदे प्रमाणे तीन दिवस कार्यालय बंद ठेवून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन गरजेचे आहे.

हेही वाचा - घरातील पोषक वातावरणाने मिळाले यश, कुणालचा युपीएससीत झेंडा...

संपर्कातील सर्वांचे स्वॅब घेतले जाणार   
सोमवारी जिल्हा कचेरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकार व अधिकाऱ्यांचे ही स्वॅब नमुने घेतल्यास यामध्ये देखील कोरोना पॉझिटिव्ह संख्या आढळून येईल. त्यांच्या संपर्कात कोण कोण आले त्यांची यादी तयार करून त्यांचे स्वॅब नमुने घेतले जातील असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.


मंगळवारी ३३ रुग्णांची कोरोनावर मात 
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्राप्त आकडेवारीनुसार मंगळवारी (ता.चार) ३३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पुन्हा नव्याने नऊ रुग्णांची भर पडली आहे. यातील २३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्यचिकितस्क डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

 

हिंगोली जिल्हा (मंगळवारी रात्रीची आकडेवारी)
एकूण बाधित - ७१८ 
आजचे बाधित - नऊ 
आजचे मृत्यु - शून्य 
एकूण बरे - ५३९ 
उपचार सुरु असलेले - १७१ 
एकूण मृत्यु - आठ 

संपादन ः राजन मंगरुळकर 

loading image
go to top