esakal | Corona Breaking ; हिंगोलीत गुरुवारी ५८ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

हिंगोली जिल्ह्यामध्ये गुरुवारी प्राप्त अहवालानुसार नव्याने एकूण ५८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सहा रुग्ण रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे बाधित झाले आहेत. 

Corona Breaking ; हिंगोलीत गुरुवारी ५८ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यामध्ये गुरुवारी प्राप्त अहवालानुसार नव्याने एकूण ५८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा रुग्ण हे रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे व ५२ रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. पाच रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. 

रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे घेण्यात आलेल्या तपासणीद्वारे महसूल कॉलनी एक, फलटण हिंगोली तीन, साईनगर कळमनुरी दोन हे सहा रुग्ण अँटीजेन रॅपिड तपासणीत आढळून आले आहेत. 

आरटीपीसीआरद्वारे ५२ रुग्ण आढळले 
आरटीपीसीआरद्वारे आढळून आलेल्या रुग्णांत सरस्वतीनगर एक, पेन्शनपुरा एक, रिसाला बाजार दोन, जि.प. क्वॉर्टर एक, देवगल्ली एक, संमती कॉलनी तीन, गाडीपुरा नऊ, नगर परिषद कॉलनी तीन, महादेववाडी एक, वंजारवाडा तीन, तोफखाना दोन, बोरी शिकारी एक, गोरेगाव सेनगाव चार, गोंदणखेडा सेनगाव एक, वसमतनगर सहा, वापटी वसमत एक, पंचायत समिती वसमत एक, जुम्मापेठ वसमत एक, चिखली वसमत एक, कलंबा, सती पांगरा वसमत प्रत्येकी एक, डोंगरकडा कळमनुरी दोन, विद्यानगर, भीमनगर कळमनुरी प्रत्येकी एक, बीएसएनएल कळमनुरी एक अशा ५२ रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचा - फेसबुकवर ओळख झाली, प्रेम जुळले, लग्नही जमले, अन्... आता गेला खडी फोडायला

पाच रुग्ण ठणठणीत बरे
गुरुवारी एकूण पाच रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन येथील दोन, विठ्ठल कॉलनी, वंजारवाडा येथील रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील तीन रुग्ण मंगळवारा हिंगोली येथील रुग्ण बरे झाले आहेत. 

हेही वाचा - Corona Breaking : उदगीरात सारीने दोघांचा मृत्यू; आणखी १३ रुग्ण पॉझिटिव्ह

२३३ रुग्णांवर उपचार चालू 
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण ७९६ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ५५५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण २३३ रुग्णांवर उपचार चालू आहेत आणि आठ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड येथे भरती असलेल्यांपैकी सात रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सुरू आहे. तर पाच रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बाय पॅपवर ठेवण्यात आले आहे. आज एकूण १२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले आहे. 

हिंगोली जिल्हा 
एकूण बाधित - ७९६ 
आजचे बाधित - ५८ 
आजचे मृत्यु - शुन्य 
एकूण बरे - ५५५ 
उपचार सुरु असलेले - २३३ 
एकूण मृत्यु - आठ 

 

संपादन ः राजन मंगरुळकर