Corona Breaking ; हिंगोलीत एकाचा मृत्यू, दिवसभरात सात पॉझिटिव्ह  

राजेश दारव्हेकर
Saturday, 8 August 2020

हिंगोली जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्ड येथे उपचार सुरु असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा शनिवारी (ता.आठ) मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीवास यांनी सांगितले. तर जिल्ह्यामध्ये नव्याने एकूण सात कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी तीन हे रेपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे व चार रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले. 

हिंगोली ः जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्ड येथे उपचार सुरु असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा शनिवारी (ता.आठ) मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीवास यांनी सांगितले. तर जिल्ह्यामध्ये नव्याने एकूण सात कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी तीन हे रेपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे व चार रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले. तर ४३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण ८१५ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६०६ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण २०० रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि नऊ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला.

हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्याने एकूण सात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे व चार रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहे तर तब्बल ४३  रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - परभणीकरांच्या मदतीला ‘माझी हेल्थ, माझ्या हाती’ ॲप, कसे ते वाचाच...

शनिवारी ४३ रुग्ण ठणठणीत बरे
रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे घेण्यात आलेल्या तपासणीद्वारे सेनगाव दोन, वटकळी एक असे तीन रुग्ण अँटीजन रॅपिड तपासणीतून आढळून आले आहेत. तर आरटीपीसीआरद्वारे आढळून आलेले रुग्णात ग्रामीण पोलिस स्टेशन वसमत एक, कौठा रोड वसमत एक, शास्त्री नगर वसमत एक, औंढा शहर एक असे चार जण आढळून आले आहेत. आज एकूण ४३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन येथील आठ, कोरोना केअर सेंटर लिंबाळा दोन, तर कळमनुरी केअर सेंटर येथील ३३ जवान कोरोनामुक्त झाले आहेत. असे एकूण ४३ रुग्ण आज बरे झाले आहेत.

हेही वाचा - अन्नधान्य किट वाटपप्रकरणी राजकारण तापले, कुठे ते वाचा...

जिल्ह्यात एकुण ८१५ रुग्ण 
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण ८१५ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६०६ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण २०० रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि नऊ रुग्णांचा मृत्यु झाला असून शनिवारी एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड येथे भरती असलेल्यापैकी आठ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सुरु आहे. तर दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्यापवर ठेवण्यात आले आहे. आज एकूण दहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले आहे.

हिंगोली कोरोना मिटर 
एकूण बाधित - ८१५
एकूण बरे - ६०६
उपचार सुरु असलेले - २००
एकूण मृत्यु - नऊ
आजचे बाधित - सात
आजचे मृत्यु - एक

 

संपादन ः राजन मंगरुळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking; One death in Hingoli, seven positives in a day, Hingoli News